मुंबई | जवळपास गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने देशात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे कित्येक शाळांना कुलूप लावण्यात आलं होतं. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याने सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जातोय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण तापल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर निकालावेळी देखील मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं होतं.
अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
बारावीच्या परीक्षेसाठीचे अर्ज शुक्रवार 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. त्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फाॅर्म भरणं गरजेचं आहे.
बारावीच्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्रे 12 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in येथे घेतले जातील, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत तिन्ही शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदने भरायची आहेत.
सरल (SARAL) डाटाबेस यावरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायची असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
तसेच आयटीआय द्वारे ट्रॅस्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत अर्ज भरायचे आहेत.
विद्यार्थ्यांच्या याद्या आणि विद्यार्थ्यांची प्री लिस्ट येत्या 28 डिसेंबर 2021ला कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे जमा करण्याचेही आदेश आले आहेत.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही कोरोनाच्या आजारामुळे रद्द झाली होती. त्या विद्यार्थ्यांना या परीक्षा शुल्कात परतावा देणार असल्याचं शासनाने जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात पाचव्या लाटेच्या उद्रेकाने भीतीचं वातावरण
“कंगनाचा वरचा मजला रिकामा, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा”
“संजय राऊत बोलून बोलून दमतात, त्यांना बॉर्नविटा पिण्याची गरज”
“एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय, पण भाजप कार्यकर्ते जाऊ देत नाहीत”
हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामशी; सलमान खुर्शिदांच्या पुस्तकावरून नवा वाद