शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! उर्जामंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा, म्हणाले…

मुंबई | राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच वादळी ठरत असल्याचं दिसत आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार वादंग पहायला मिळत आहे.

आज अधिवेशनात विरोधकांनी वीजतोडणीवरुन चांगलाच गोंधळ घातलेला पहायला मिळाला. अशातच आता उर्जामंत्र्यांनीही वीजतोडणीविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे.

आज विधासभेत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. नितीन राऊत यांनी मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा आहे.

वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी तीन महिने कृषी वीज ग्राहकांची वीज तोडणी आम्ही तात्पुरत्या स्वरुपाचा थांबवण्याचा निर्णय नितीन राऊत यांनी दिला आहे.

विरोधकांनी आज वीजतोडणीच्या मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरलं. त्यांच्यावर अनेक मुद्द्यावरुन आरोप केले.

गेल्या अनेक दिवसांपासून वीजतोडणीचा विषय ऐरणीवर असल्याचं पहायला मिळत आहे. यावरुन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या.

शेतकऱ्यांनी आपला जीव गमावल्यामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. अशातच आता उर्जामंत्र्यांनी काही काळापुरता दिलासा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  नवाब मलिकांना दिलासा नाहीच; मुंबई उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

  मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

  ‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल