नवाब मलिकांना दिलासा नाहीच; मुंबई उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय

मुंबई | मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीनं अटक केलं होतं. यानंतर त्यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालय ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. यावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली आहे.

नवाब मलिकांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे आताही मलिकांना दिलासा मिळालेला नाही.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात मोठा संघर्ष उद्भवला आहे. भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.

मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत विरोधक टीका करत आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. सरकारने त्याबाबतची घोषणा करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, आजही विधानभवनात देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांची याचिका फेटाळल्यावरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार? आता त्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे स्पष्ट आहे की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय, असं फडणवीसं यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

  मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

  ‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर