मोठी बातमी ! माजी क्रिकेटर विनोद कांबळीला अटक

मुंबई | भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविषयी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडालेली पहायला मिळाली.

आज रविवारी मुंबई पोलिसांनी विनोद कांबळीला अटक केली होती. मात्र काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

मुंबईतील वांद्रा परिसरात विनोद कांबळीने नशेत गाडी चालवली होती. दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या गाडीला टक्कर मारली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

आयपीसी धारा 279 , 336 आणि 427 हे आरोप लावण्यात आले आहेत. विनोद कांबळी वांद्रे येथे ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीच्या गेटवर त्याची गाडी आदळली. यावरून विनोदचा वॉचमन आणि तेथील रहिवाशांसोबत वाद झाला.

हा किरकोळ वाद इतक्या टोकाला गेला की इमारतीमधील रहिवाशांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली.

50 वर्षांच्या विनोद कांबळीने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्डही केले आहेत, तसंच तो सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Corona Update: देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

  “सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत…” संभाजीराजे भूमिकेवर ठाम

 “मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर युक्रेन आणि रशिया युद्ध झालंच नसतं”

 मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स