Corona Update: देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

मुंबई | कोरोना हळूहळू आटोक्यात येत असलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे परिस्थीती पूर्वपदावर येत आहे. अशातच देशातील कोरोना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

आज राज्यात 782 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात फक्त दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,65,298  झाली आहे. पुण्यात मुंबईपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 103 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

दिवसभरात एक हजार 361 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,36,445 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोरोना लसींचे सुमारे 170 कोटी डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत लसीचे 170 कोटी 87 लाख 6 हजार 705 डोस देण्यात आले आहेत.

कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोना नियमांमध्येही शिथिलता पहायला मिळत आहे. आता राज्य सरकारकडून लवकरच अनलाॅक होणार असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोरोना आटेक्यात येत असेलला पाहून राज्य सरकार हळूहळू निर्बंध कमी करत आहे. मार्च महिन्यानंतर राज्यात 100 टक्के अनलॉक केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे.

आटोक्यात आलेला कोरोना पाहता अजून जास्त दिवस निर्बंध राहणार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाही काहिश्या प्रमाणात दिलासा आहेच.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत…” संभाजीराजे भूमिकेवर ठाम

 “मी जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर युक्रेन आणि रशिया युद्ध झालंच नसतं”

 मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

मोठी बातमी! दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पिता-पुत्रांना झटका