मोठी बातमी! संपत्ती जप्त होण्याआधीच फरार परमबीर सिंह मुंबईत परतले

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग जर न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला होता.

गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आज अखेर संपत्ती जप्त होण्याआधी परमबीर सिंग मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

परमबीर सिंग लवकरच चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती आहे. परमबीर सिंग मुंबईत आल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी लवकरच चौकशीसाठी मुंबईला येणार असल्याचं स्वत: परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून परमबीर सिंह कुठे आहेत असा प्रश्न विचारण्यात येत होता.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय” 

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता- राजेश टोपे 

एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; अनिल परबांची मोठी घोषणा 

एकनाथ शिंदे की अजित पवार?, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार??? 

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला झटका, केली ‘ही’ मोठी घोषणा