मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आक्रमक आंदोलन केलं होतं. याप्रकरणी वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) गेल्या चार दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत.

आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदावर्तेंना अटक देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर 109 कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली.

गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

अशातच न्यायालयाने सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सदावर्तेंच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 7 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना न्यायालयाने कारागृहातून गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची परवानगी दिली.

दरम्यान, या प्रकरणात अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये तर बाकी सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता बाकींच्या देखील जामीन मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘सगळेच राजकारणी एकसारखे नसतात, काही आनंद दिघेही असतात’; पाहा व्हिडीओ

नवाब मलिकांना धक्क्यावर धक्के! अटकेनंतर आता ईडीने मोठी कारवाई केली

“उद्धव ठाकरेंना भेटलो…”, शिवसेना-वंचित युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत खळबळजनक माहिती समोर!

मंत्री धनंजय मुंडेंच्या तब्येतीसंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती!