मोठी बातमी! आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर प्रक्रिया सुरु

मुंबई | राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारं संतोष परब हल्ला प्रकरण चांगलंच गाजलं होतं.  या प्रकरणात भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोकणात कणकवलीमध्ये घडलेलं हे प्रकरण आता संपुर्ण राज्यभर गाजत आहे.

राणे यांनी जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केले पण सर्वोच्च न्यायालयानं देखील त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता.

त्यानंतर नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली होती. त्यानंतर राणे यांनी न्यायालयासमोर शरण गेले. नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबद्दलची माहिती दिली होती.

अशातच नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात देखील अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतला आणि आज राणे  न्यायालयासमोर शरण गेले होते.

दरम्यान, या प्रकरणात नितेश राणे यांना लवकरच जामीन मिळण्याची शक्यता आहे. आजपर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीररित्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”