मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास खलबतं

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास खलबतं झाली. या भेटीत राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीवर नाराज होते. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आता भाजप आणि मनसेमध्ये युतीची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो. यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.

काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील युतीवर भाष्य केलं आणि मागील युतीच्या बैठकांबाबत खुलासा केला. त्यामुळे आता राजकीय समीकरणं बदलतील का काय?, असं चित्र निर्माण होत आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील दोन्ही नेत्यांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोघांत खलबते झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

…अन् अखेर वारकरी संप्रदायाच्या आक्रमकतेसमोर पोलीस अधिकारी नमला!

 “…तर मी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे टॉपलेस होईन”, अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

“देवेंद्र फडणवीस वर्षभरात राज्याचे मुख्यमंत्री होतील”, चंद्रकांत पाटलांचा दावा

 पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार”