मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली

मुुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकिल आणि एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आता पुन्हा न्यायालयाने दणका दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गिरगाव न्यायालयाने आणखी 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधी सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर देखील सरकारी वकिलांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली आहे. पोलीस कोठडीच्या दोन दिवसांत त्यांची चौकशी केली गेली. पण दोन दिवसांचा कालावधी हा चौकशीसाठी पुरेसा नाही, असं वकिलांनी म्हटलं.

कुछ बातें हो चुकी है, कुछ बातें अभी है बाकी, अशी परिस्थिती असल्याने सदावर्तेंना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, सदावर्तेंच्या पोलीस कोठडी सुनावल्याने आता त्यांना 13 तारखेपर्यंत जेलमध्येच रहावं लागणार आहे. तर दुसरीकडे सदावर्तेंचे वकिल त्यांच्या जामीनासाठी धावपळ करत असल्याचं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राजभवनाचे बँक खाते नव्हते म्हणून…”; सोमय्यांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

“अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावं”

“लोक बेकार असतात, माझ्या सारखे सेक्सी कपडे घालतात त्यांना…”

संजय राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचंय, म्हणाले ‘उद्धव ठाकरे मला मानसन्मानाने ….’

“शरद पवारसाहेब नसते तर मी कधीही खासदार झाले नसते”