मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्ड परीक्षेस बसता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं न घेता, त्या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. विद्यार्थ्यांची परीक्षा ठरलेल्या तारखेनूसारच होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं न घेता, त्या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा तोंडावर आल्या असतानाच कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांमध्येही काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या काळात ज्या विद्यार्थ्यांना ठरेलल्या तारखेला परीक्षा देता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना जून महिन्यात परिक्षा देता येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

संबंधित विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला भाग सील केला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना आता दहावी बारावीची परीक्षा देता येणार नाही. त्यांची जून महिन्या विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.

आताच्या परीक्षेला विद्यार्थी हजर नसेल, तर संबंधीत शाळा, कॉलेजने त्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. यामुळे त्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही आणि त्याला जूनमध्ये परीक्षेला बसता येईल.

तसेच राज्यातील कोरोनाची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. त्यामुळे सरकारने काही निर्बंधही लागू केले आहेत. त्यामधी सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, इत्यादी नियमांचा समावेश करण्यात आला आहे. तरीदेखील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नाहीय. त्यामुळे कोरोनाची परिस्थीती पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समजत आहे.

दरम्यान, दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. तसेच बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘देव तारी त्याला कोण मारी’; 12व्या मजल्यावरून…

जाणून घ्या! उन्हाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने…

वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये…

“यूपीएचा विषय केंद्रातला, जिल्हास्तरावरील लोकांनी यावर…

पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य,…