मृत्यू होत असताना माणूस काय विचार करतो?; संशोधनातून मोठा खुलासा

मुंबई | मृत्यू होत असताना मनुष्य नेमका काय विचार करतो? यासंदर्भात अनेकांना उत्सुकता असते. मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याची आपल्याला नेहमीच उत्सुकता असते.

मरताना माणसाचं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर फ्लॅशबॅकसारखं फिरत असल्याचे अनेक चित्रपटांतून दाखवण्यात आलं आहे. आता याबाबत एका संशोधनातही महत्त्वाची बाब समोर आली आहे.

फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान जर्नलमध्ये असं समोर आलं आहे की, मरताना आपल्याला जीवनातील सर्व खास क्षण आठवतात. या जर्नलचे शीर्षक ‘एनहान्स्ड इंटरप्ले ऑफ न्यूरोनल कोहेरेन्स अँड कपलिंग इन द डायिंग ह्युमन ब्रेन’ असं आहे.

या संशोधनात मृत्यू झालेल्या किंवा मृत्यूला स्पर्श करून परत आलेल्या नागरिकांचा डेटा घेण्यात आला. तेव्हा हा शोध अचानक लागला.

संशोधक 87 वर्षांच्या मिरगीच्या रुग्णाची तपासणी करत होते. त्या रुग्णाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या मेंदूचे स्कॅनिंग केलं जात होतं.

मृत्यूपूर्वी, त्याच्या मनात काय चाललं होतं याची त्याला एक प्रतिमा ही लहरींच्या रूपात मिळाली, ती पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

संशोधनात असंही आढळून आलं की जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हृदय थांबतं तर मेंदू 30 सेकंद चालू राहतो. यापूर्वी असं संशोधन मानव सोडून इतर प्रजातींवर झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

खळबळजनक! शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या 

‘कपड्यांचे रंग बदलले म्हणून…’; आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला 

Russia-Ukrain War: “व्लादिमीर पुतिन युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करू शकतात” 

…अन् महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास भर रस्त्यात चोपलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल