शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात जमा होणार 15 हजार रुपये; जगनमोहन रेड्डींची मोठी घोषणा

अमरावती | आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दारिद्र रेषेखालील महिलांसाठी महत्वाकांक्षी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांच्या खात्यात दरवर्षी 15 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे. 15 हजार रुपये वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. जो पर्यंत मुलाचे शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे.

राज्य सरकारकडून गेल्याच आठवड्यात हा आदेश जारी करण्यात आला असून 43 लाख मातांना याअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी ही योजना राज्य सरकारने आणली आहे.

विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत दहावी ते बारावीत शिकणारे सर्व विद्यार्थी , मग ती खासगी शाळा असो किंवा सरकारी शाळा असो, अनुदानित असो किंवा विनाअनुदानित असो या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-