मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हायप्रोफाईल कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आता आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे.
28 ऑक्टोबर रोजी आर्यनची जामिनावर सुटका करण्यात आली. अशातच त्याला आता क्लीन चिट मिळाली आहे.
या प्रकरणामधील 14 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यन खानसह सहा जणांना या प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे.
एनसीबीनं क्रुझवर छापा टाकत प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. तेव्हापासून या प्रकरणानं राज्यात खळबळ माजवली आहे.
ड्रग्ज आर्यन खान याला एनसीबीनं अटक केली होती. मुंबई क्रुझवर टाकलेल्या छाप्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान झालेल्या खुलास्यांमुळे त्याला अटक करण्यात आलं.
एनसीबीने मुंबई सत्र न्यायालयात आज आरोपपत्र सादर केलं. जवळपास एकूण 10 खंडांचं आणि 6000 पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे.
आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“स्वाभिनाने जगणारा संभाजी छत्रपती आहे, कोणासमोर झुकून मी खासदारकी घेणार नाही”
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरेंनी सांगावं की मी…”
सेक्स वर्क हा एक व्यवसाय, त्यांनाही सन्मानाची वागणूक द्या- सर्वोच्च न्यायालय
शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…