‘बिग बॉस’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं कौटुंबिक वादातून केला आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई| बिग बॉस हा कार्यक्रम सुरुवातीला हिंदीत सुरू झाला होता. पण त्याची लोकप्रियता पाहाता मराठी तसेच अनेक दाक्षिणात्य भाषेत हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमामुळे आजवर अनेक स्पर्धकांना प्रसिद्धी मिळाली आहे. कन्नड ‘बिग बाॅस 7’ ची मध्ये अभिनेत्री चैत्रा कोट्टूरने हजेरी लावली होती. या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

अभिनेत्री चैत्रा कोटूरने काल, 8 एप्रिल आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने घरातील फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

कौटुंबिक वादातून चैत्रा कोटूरने हे  टोकाचं पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. लग्नानंतर ओढावलेल्या वादातून चैत्राने हे पाऊल उचलंल आहे.

काही दिवसांपूर्वीच चैत्राने उद्योगपती नागार्जुन याच्याशी लग्न केले होते. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार चैत्रा लग्नानंतर आनंदी नव्हती. नागार्जुनच्या परिवाराने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला होता. तर याबाबत नागार्जुनने सांगितले की त्याने चैत्राबरोबर त्याच्या मर्जीने लग्न केले नव्हते तर जबरदस्ती तिच्याशी लग्न करून देण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून चैत्रा नागार्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. चैत्राने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी एका मंदिरात नागार्जुनसोबत लग्न केले होते. नागार्जुन हा व्यवसायिक असून या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

चैत्राचे लग्न झाल्यामुळे तिचे फॅन्स प्रचंड खूश झाले होेते. मात्र लग्नाच्या काहीच दिवसानंतर नागार्जुनच्या कुटुंबियांनी चैत्रावर गंभीर आरोप केले होते. नागार्जुनला धमकावून हे लग्न केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता आणि आता नागार्जुनने देखील काही लोकांच्या दबावाखाली येऊन लग्न केले असे म्हटले आहे.

चैत्रा आणि नागार्जुन यांचे 28 मार्चला या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले. या दोघांनी गणपती मंदिरात लग्न केले. यावेळी त्यांच्या घरातील काही जवळचेन नातेवाईक उपस्थित होते.

कोलारमधील पोलिस ठाण्यात चैत्राने तक्रार नोंदवली असून नागार्जुनच्या कुटुंबियांनी या लग्नाला मान्यता न दिल्याने चैत्राला त्याच्या घरातही प्रवेश नाकारला होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्याच्या घरातल्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असे देखील तिने पोलिसांना सांगितले आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

तरुणावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला! हलक्या काळजाच्या लोकांनी…

जमीन खोदताना आवाज आला अन् शेतकरी मालामाल झाला; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

कर्माची फळं! मंदिरात चोरी करायला गेला अन् दानपेटीत हात अडकला मग…; पाहा व्हिडीओ

बोंबला! चालू विमानात दारू न मिळाल्यानं ‘या’ मॉडेलने क्रू मेंबरला मारहाण केली अन्…

आता तुम्ही तुमचं आधार, पॅन कार्ड ‘या’ पद्धतीने लिंक करू शकता, वाचा सविस्तर