मनसेला सर्वात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबत चालू आहेत. मनसेला शिवसेनेने जबरदस्त धक्का दिला आहे. आपल्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले मनसेचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितिन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी रात्री उशिरा नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी नांदगावकर यांना अपेक्षा होती. मात्र मनसेच्या दोन याद्या प्रसिद्ध होऊनही नांदगावकर यांना स्थान मिळालं नाही.

मनसे स्टाईल खळ्ळ फटॅक आंदोलनामुळे नितिन नांदगावकर चर्चेत आले होते. आक्रमक शैलीमध्ये अनेकांना न्याय मिळवून दिला होता. हल्लीच त्यांनी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टॅक्सीचालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता.  

उद्धव ठाकरे यांनी नांदगावकरांना शिवबंधन बांधलं आणि हाती भवगा झेंडा दिला. त्यानंतर आपण शिवसेनेचं काम महाराष्ट्रभर पोहचवू, असा विश्वास त्यांनी उद्धव यांना दिला.

दरम्यान, नव्या जोमाने कामाला लागलेल्या मनसेला विधानसभेच्या तोंडावर नांदगावकर यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-