चंद्रकांत पाटलांच्या ‘या’ वक्तव्याने खडसेंच्या आशा पल्लवित

मुंबई : भाजपने जाहिर केलेल्या पहिल्या यादीत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेले नाही. खडसेंच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजून एक यादी जाहीर होणार असून ‘देर है अंधेर नही’ असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे खडसेंचे पुढच्या यादीत तरी नाव येईल अशी अपेक्षा आहे.

भाजपकडून 125 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. त्यांमध्ये खडसे यांचे नाव नसल्याने त्यांचे तिकीट भाजपने कापल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटलांना खडसेंच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर अनेक नेते उमेदवारीसाठी मला येऊन भेटले त्याप्रमाणे रक्षा खडसे याही मला भेटल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. 

एकनाथ खडसे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने खडसे यांना नाराजी लपवता आली नाही.

आपण चार दशके पक्षाशी एकनिष्ठ असून, पक्ष योग्य निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्यास खडसे माघार घेणार की बंड करणार, याबाबत उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या-