“…तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीलाही जाळल्याशिवाय राहणार नाही”

बुलडाणा | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि चौकशीमुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

बुलडाण्यात तर भाजप आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी प्रचंड आक्रमक होत महाविकास आघाडीला जाळण्याचा शब्दोच्चार केल्याचं पहायला मिळालं.

भाजपकडून राज्यभरात नोटीशींची होळी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं. बुलडाण्यातही भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.

भाजपने खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर नोटीसची होळी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली. यावेळी प्रतक्रिया देताना आकाश फुंडकर प्रचंड आक्रमक झाले.

देवेंद्र फडणवीस यांना हात लावला तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आकाश फुंडकर यांनी दिला आहे.

दरम्यान, ज्या बदल्यांचा जो महाघोटाळा झाला. या घोटाळ्याची सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांकडे पोहोचवली. त्यानंतर न्यायालयाने याची चौकशी सीबीआयकडे सोपवली. याचाच अर्थ महाघोटाळा घडला म्हणून सीबीआय ही चौकशी करत आहेत. महाघोटाळ्याची चौकशी राज्य सरकार करु शकत नाही कारण, सहा महिने त्यांनी अहवाल दडवून ठेवला होता. मी जर हा घोटाळा बाहेर काढला नसता तर कोट्यावधींचा घोटाळा दबून राहिला असता, असं ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट

मोठी बातमी! झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासमोर ठेवला ‘तो’ प्रस्ताव

“उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, बाळासाहेबांचं नाव लावताना” 

“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार” 

“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील”