फोटो तुमचा फोटोग्राफरही तुमचा पण रेसची फोटोफिनिश आम्हीच करणार- आशिष शेलार

मुंबई | फोटो तुमचा…. फोटोग्राफरही तुमचा…. पण या रेसची फोटोफिनिश भारतीय जनता पार्टी करणार आहे. त्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही या रेसची फोटोफिनिश करणार असल्याचा दावा, भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

‘आम्ही 162’ म्हणणाऱ्यांच्या त्या सभागृहात 145 आमदार तरी होते का? , असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थिती केला आहे. आघाडीच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजपकडून शेलारांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे.

आदरणीय आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाची शपथ घेतली. त्यामुळे सत्तेसाठी शिवसेनेचं नेतृत्त्व किती बेगडी असल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

हॉटेल ग्रँड हयातमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र आले होते. यावेळी तिन्ही पक्षांच्या आमदारांना संविधानाची शपथ देण्यात आली. या शपथेवेळी पक्षाने घेतलेल्या निर्णय आम्हाला मान्य असेल आणि तसंच आम्ही वागू असं वदवून घेण्यात आलं. यावरच आशिष शेलारांनी टीकास्त्र सोडलं.

महत्त्वाच्या बातम्या-