“पंतप्रधान मोदीच देव असल्यासारखं भाजपचं वर्तन”

मुंबई | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. मोदींचा पुणे दौरा सुरु होण्याआधीच राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळत होतं.

मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन आता काॅंग्रेसनं मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. पुणे दौऱ्यात मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातं अनावरण केलं. यावरुनच काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर घणाघात केला आहे.

नरेंद्र मोदी हे आमच्या महापुरुषांपेक्षा मोठे आहेत हे भाजप दाखवण्याचा प्रयत्न करत असते परंतु मोदी हे शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांपेक्षा मोठे नाहीत, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल देखील महाराजांचा अपमान करतात. भाजपसाठी नरेंद्र मोदीच देव आहेत असं वर्तन भाजपचं आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

आजही पुण्यातील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या पगडीवर छत्रपत्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावण्यात आली होती. काँग्रेसने त्याला आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली.

राजमुद्रा आणि छत्रपतींचा अपमान करण्याचा कॉन्ट्रॅक्ट भाजपनं घेतलाय का?, असा सवालही नाना पटोलेंनी भाजपला विचारला आहे.

नाना पटोले यांनी मोदींचा फोटो शेअर करत एक ट्विट केलं आहे. हे ट्विटही चांगलंच चर्चेत आल्यातं दिसत आहे.

मोदींचा फोटो शेअर करत नाना पटोले यांनी लिहिलं की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्टासमोर शेवटी तुम्ही छोटे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत…”

  पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एका क्लिकवर 

  …तोपर्यंत एसटीमध्ये नोकर भरती बंद, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!

  “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याला आणि महाराष्ट्राला भरपूर दिलंय”

भर सभेत अजित पवारांचे राज्यपालांना खडे बोल, मोदीही पाहत राहिले