“ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त”

उस्मानाबाद | सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका पहायला मिळत असतात.

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उस्मानाबाद दौऱ्यावरच्या भाषणात शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी राजकारणावरही भाष्य केलेलं पहायला मिळालं.

शरद पवारांसमवेत राष्ट्रवादीचे अनेक मंत्रीही उपस्थित होते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, होत्याच नव्हतं नव्हत्याचं केलं तरी भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरु आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

ईडीची तर इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त आहे. त्यांना वाटतंय की आम्ही यांना झुकवू शकतो, असा घणाघातही यावेळी मुंडेनी केला.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.

मोदींच्या दौऱ्यावरुनही राजकीय वर्तुळातील वातावरण तापल्याचं पहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “पंतप्रधान मोदीच देव असल्यासारखं भाजपचं वर्तन” 

  “82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत…”

  पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एका क्लिकवर 

  …तोपर्यंत एसटीमध्ये नोकर भरती बंद, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!

  “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याला आणि महाराष्ट्राला भरपूर दिलंय”