पुणे | अजित पवार मुलाचं सोडून कोणाचंच कौतुक करत नाहीत असा टोला खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
गिरीश बापट पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगतापसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधक वैतागले आहेत, त्यात दादा तर खूपच वैतागलेले आहेत. शेवटी इतकी वर्ष सत्तेत राहण्याची सवय लागली, त्यांना आदर्श विरोधी पक्ष म्हणून काम करता येत नाही, असा टोला गिरीश बापट यांनी अजित पवारांना लगावला.
कसं काम करायचं ते आमच्याकडून शिकावं. म्हणून मी व्यक्तिगत दादा असं म्हणून बोलणार नाही. राजकारणात काही पथ्य पाळलेली आहेत, असंही अजितदादा म्हणाले.
दरम्यान, ते विरोधी पक्षातील आहेत. त्यांनी आम्हाला आमच्या चुका दाखवल्यास त्याचं स्वागत करेन. त्यांनी सूचना देणं याचंदेखील स्वागत करेन. पण, प्रश्नही समजून घेतले पाहिजेत, असं गिरीश बापट यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरे ‘या’ मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात?- https://t.co/QxgranblYW #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
22 उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर- https://t.co/GfCEu8SV6S #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
बापाकडे बघून मुलाला कोणी मुलगी देत नाही; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना टोला- https://t.co/kYRvqggpp6 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019