ज्योतिरादित्य शिंदेनी भाजपप्रवेश करताच राजेंच खास ट्वीट

नवी दिल्ली |काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला गुडबाय करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने त्यांच्या आत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना आनंद झाला आहे. त्यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज जर राजमाता विजयाराजे आपल्यामध्ये असत्या तर त्यांना तुमच्या निर्णयाने खूप आनंद झाला असता. मी तुमच्या निर्णयाने प्रचंड खूश झाली आहे. मी तुमचं भाजपमध्ये खूप खूप स्वागत करते, असं त्या म्हणाल्या आहेत.

ज्योतिरादित्य यांनी राजमातांच्या वारसाने मिळालेल्या उच्च आदर्शांचे अनुसरण करून राष्ट्रीय हिताचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या वतीने आणि पार्टीच्या वतीने तुमचं स्वागत करते, असं त्या ट्वीटमध्ये म्हटल्या आहेत.

दरम्यान, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मला काँग्रेस सोडताना दु:ख होत आहे पण ही काँग्रेस आता पूर्वीची काँग्रेस राहिली नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या – 

भाजपने या दोन नेत्यांची तिकीट कापली… तर या दोन नेत्यांना लागली लॉटरी!

-उदयनराजेंचं राजकीय भविष्य भाजपने ठरवलं; घेतला हा मोठा निर्णय…

-धक्कादायक! पुण्यात कोरोनाग्रस्त कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार उघड

-मध्य प्रदेश प्रकरणाने उकळ्या फुटल्या तर पाकळ्या गळून पडतील – अमोल मिटकरी

-शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या आखाड्यात… राज्यसभेसाठी अर्ज दाखल