महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रूग्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रूग्ण सापडले आहेत. पुण्यात 8 आणि मुंबईत 2 असे महाराष्ट्रात कोरोनाचे 10 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. मात्र त्यांच्यात गंभीर लक्षणं आढळले नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असं म्हटलं आहे.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात जायला हवेत.म्हणून अधिवेशनाचं कामकाम पूर्ण करुन शनिवारी किंवा रविवारी संपवायचा विचार आहे. परदेशातून येणाऱ्यांची तपासणी सुरु आहे. त्यांना घरातच वेगळं राहण्याची सुचना केली आहे. घाबरण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले.

सध्या शाळांना सुट्टी देण्याचा विचार नाही. आवश्यकता लागली तरच शाळांना सुट्टी देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकार आणखी दोन दिवस व्यवस्थित आढावा घेईल आणि नंतरच त्याबाबतीतला निर्णय घेण्यात येईल, असं ते म्हणाले.

आयपीएलच्या सामन्याबाबत अधिकृत काही प्रस्ताव आलेला नाही. प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्यास आयोजक तयार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आमच्याकडे त्यांनी तसं कळवलेलं नाहीये. काहीही झालं तरी गर्दी मात्र टाळायला हवी, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

-ज्योतिरादित्य शिंदेनी भाजपप्रवेश करताच राजेंच खास ट्वीट

-भाजपने या दोन नेत्यांची तिकीट कापली… तर या दोन नेत्यांना लागली लॉटरी!

-उदयनराजेंचं राजकीय भविष्य भाजपने ठरवलं; घेतला हा मोठा निर्णय…

-धक्कादायक! पुण्यात कोरोनाग्रस्त कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार उघड

-मध्य प्रदेश प्रकरणाने उकळ्या फुटल्या तर पाकळ्या गळून पडतील – अमोल मिटकरी