“ज्यांना जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजावं लागलं, त्यांनी भाजपला न बोललेलंच बरं”

मुंबई | 25 फेब्रुवारी रोजी भाजपनं महाविकास आघाडीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, याआधिच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते अतुल भातखळकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे.

पुन्हा निवडणुका झाल्या तर भाजपला 15-20 जागाही मिळणार नाही, अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली होती. यावर ज्यांना जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजावं लागलं, त्यांनी 105 जागा जिंकलेल्या भाजपला न बोललेलं बरं असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपकडून 25 फेब्रुवारीला राज्यातील सर्वच तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपकडून या मोर्चासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्र, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप मोर्चा काढणार आहे मात्र त्यासाठी त्यांच्याकडे लोकं तरी आहेत का? भाजपचा फुगा आता फुटला आहे. मात्र, तरीही भाजप महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं स्पप्न पाहात आहे, असं म्हणत मलिकांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही शिवभक्त अन् छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे- उद्धव ठाकरे

-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!; पंतप्रधानांनी केला खास शैलीत मुजरा

-राकेश मारियांनी 26\11 हल्ल्यासंदर्भात केला ‘हा’ मोठा खुलासा!

-शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिला मानाचा मुजरा

-छत्रपती शिवरायांचे स्टेटस व्हिडीओ घालतायत सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ!