आम्ही शिवभक्त अन् छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे- उद्धव ठाकरे

पुणे | इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असं वाटतंय. मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगलं होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आज आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवभक्त म्हणून याठिकाणी आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. ज्यावेळी देशावर हिरवं संकट आले होतं त्यावेळी त्याच्या चिंधड्या करण्याचं काम छत्रपतींनी केलं. आमचे विचार भगवा आहे, आमच्या धमन्यात भगवा असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, शिवरायांच्या चरणी आज मी एकच मागितलं आहे. प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक पाऊली आम्हाला तुमचं मार्गदर्शन राहू द्या. जनतेला अपेक्षित सरकार आल्यामुळे आज ही गर्दी दिसतेय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!; पंतप्रधानांनी केला खास शैलीत मुजरा

-राकेश मारियांनी 26\11 हल्ल्यासंदर्भात केला ‘हा’ मोठा खुलासा!

-शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिला मानाचा मुजरा

-छत्रपती शिवरायांचे स्टेटस व्हिडीओ घालतायत सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ!

-…तर इंदोरीकरांच्या तोंडाला आश्रमात जाऊन काळं फासू- तृप्ती देसाई