राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कोरोना ही देशावरील आपत्ती आहे. आज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश त्याचा एकजुटीने सामना करतोय. राज्य सरकार यासाठी जी काही पाऊले उचलत आहे, त्याला आमचं संपूर्ण समर्थन आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

फडणवीसांनी हे आवाहन करतानाच आताची परिस्थिती हाताळण्यासाठी काही सूचना सुद्धा त्यांनी राज्य सरकारला केल्या आहेत.

दरम्यान, रोजगारावर जे संकट आले त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-मी पण घरी आहे, तुम्ही पण घराबाहेर पडू नका- इंदोरीकर महाराज

-मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही थुंकोबांना भरावा लागणार भुर्दंड; महापौरांनी घेतला निर्णय

-तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर परस्थिती बिघडू शकते- तुकाराम मुंढे

-कोरोना व्हायरसमुळे हस्तांदोलन टाळा, नमस्कार करा; शरद पवारांचा सल्ला

-“हे सरकार रोज कोरोना रुग्ण किती वाढतायत ह्याची माहिती देण्यासाठीच आहे काय?”