भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला रुग्णालयात हलवलं, अहवालात कोरोना झाल्याचं उघड

नवी दिल्ली | मध्य प्रदेशातील भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माधवी शिंदे यांना कोरोनासदृश्य लक्षणं दिसल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोना चाचणीमध्ये दोघांनाही कोराना झाल्याचं उघड झालं आहे.

नवी दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरु आहेत.  दोघांची प्रकृती सामान्य असल्याचं सांगितलं जात आहे.

ज्योतिरादित्य शिंदे आणि आणि त्यांच्या मातोश्रींना सोमवारी साकेत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोघांनाही ताप असून त्यांचा घसा खवखवत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही लक्षणे आढळल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना त्यांच्या डॉक्टरांनी दिल्या.

आज त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आता चौकशी केली जात आहे. त्यांचीही कोरोना टेस्ट केली जाणार असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-‘निसर्ग’मुळे कंबर मोडलेल्या कोकणवासियांना शरद पवारांनी असा दिला धीर

-रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री…; राष्ट्रवादीचं राजनाथ सिहांना सणसणीत प्रत्युत्तर

-महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उ. प्रदेशकडून शिकावी- राजनाथ सिंह

-….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

-सोनू तू राऊतकडे लक्ष देऊ नको, आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही- चित्रा वाघ