विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदाराची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती

बंगळूरू | 2012 मध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण सावादी यांना इतर दोन आमदारांसहीत कर्नाटक विधानसभेत पॉर्न पाहताना पकडण्यात आलं होतं. आता सावादी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आपल्या मंत्रीमंडळामध्ये  उपमुख्यमंत्री पद दिलं आहे. यावरून सावदी हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही लक्ष्मण यांच्या खांद्यावर थेट इतकी मोठी जबाबदारी टाकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येडियुरप्पा यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.

वादग्रस्त पार्श्वभूमी असणाऱ्या सावादी यांना इतके महत्वाचे पद देण्याच्या येडुरप्पा यांच्या निर्णयावर पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत.

2012 साली कर्नाटकात भाजपचे सरकार असताना तत्कालिन मंत्री आणि भाजप आमदार लक्ष्मण सावादी विधानसभेचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर पॉर्न क्लिप पाहत होते. विधानसभेत त्यावेळी दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा सुरु होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हे कृत्य त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं होतं.

दरम्यान, जनतेने निवडून न दिलेल्या व्यक्तीला भाजपने उप मुख्यमंत्रीपद दिलं आहे. भाजपला कसलीच लाज वाटत नाही, अशी टिका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-