“जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं”

मुंबई | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. अशातच आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशात आता भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचं चित्र दिसतंय.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यावरून आता राज्यातील भाजप नेते शिवसेनेवर निशाणा साधत आहेत.

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

जावेद भाई अपना हार्मोनीयम पॅक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, असं मोहित कंबोज म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांचा हार्मोनीयम वाजवताचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना हाउज द जोश?, असा सवाल विचारला होता. त्यामुळे आता शिवसेना याला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“मी सांगितलं होतं ते ते घडत गेलंय, आता 11 तारखेला …”

“महाराष्ट्र अभी बाकी म्हणणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है”

पंजाबमधील पराभवानंतर शरद पवारांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला, म्हणाले… 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं!

काँग्रेसलाजमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं!