“मी सांगितलं होतं ते ते घडत गेलंय, आता 11 तारखेला …”

मुंबई | भाजपने मिळवलेल्या 5 राज्यातील विजयानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया (Maharashtra) येत आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी दिलेली तारखांना बॉम्ब पडला, 10 तारखेला चार राज्य जिंकली आता पाहू, 11 तारखेला काय होतं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरले पाहिजे. कारण राऊत लोकसत्तेत जातील उद्या तरूण भारतमध्ये येतील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे, असा सल्लावजा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

पाच पैकी चार राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात लढले पण महिलांसाठी मोदींनी जे काम केलं त्यामुळे हे यश मिळालं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पहिले चार राऊंड व्हर्च्युअल असल्यामुळे थोडे कमी मिळाले नाहीतर 324च्यावर आकडे गेले असते, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

दरम्यान, देशात एक नेतृत्व नागरिकांनी मान्य केलं आहे आणि ते म्हणजे भाजपचं आहे. भाजपचे विचार, त्यांचे कर्तृत्व, वागणं, बोलणं यावर नागरिकांचा विश्वास आहे, असं भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलंय.

पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे. भाजप बहुमत मिळवत मुख्यमंत्री बसवणार आहे. संपूर्ण देश हा लवकरच भाजपामय होईल, असं महाजनांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्र अभी बाकी म्हणणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है”

पंजाबमधील पराभवानंतर शरद पवारांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला, म्हणाले… 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं!

काँग्रेसलाजमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं! 

भाजपचा राऊतांना चिमटा, म्हणाले “संजय राऊत हाउज द जोश!”