…आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची पाळी आली- निलेश राणे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यावरून आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

अगोदर आमदार मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करायचे. आता मुख्यमंत्री आमदार झाल्यावर अभिनंदन करायची पाळी आली. अगोदर मुख्यमंत्री आमदार निवडून आणायचे, आताच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःआमदार होता येत नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

2 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहावर निवडून जाणं आवश्यक आहे. त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी येत्या 27 मे रोजी पूर्ण होणार आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये पार पडणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये- उद्धव ठाकरे

-“काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय”

-परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

-माझ्या पराभवासाठी चीन काही करू शकतं- डोनाल्ड ट्रम्प

-एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं; ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो- राज ठाकरे