“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

वॉशिंग्टन | कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरणाऱ्या लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील 80 वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुरु आहे. अशातच अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील संशोधकांनी ‘रेमडेसिवीर’ हे औषध कोरोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा केला आहे.

कोरोनावर मात करणारं औषध सापडल्याचा दावा करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणाऱ्या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

रेमडेसिवीर औषधांचा वापर करण्यात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं अढळून आलं आहे, असं फॉउसी यांनी स्पष्ट केलं आहे. रेमडेसिवीर देण्यात आलेल्या रुग्णांनी कोरोनावर 30 टक्के वेगाने मात केल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, पूर्ण 100 टक्के परिणाम दिसून आला नसला तरी हे यशच आहे. कारण या प्रयोगांमधून औषधांमुळे या विषाणूचा प्रसार थांबवता येईल हे सिद्ध झालं आहे, असं मत फॉउसी यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये- उद्धव ठाकरे

-“काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय”

-परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

-माझ्या पराभवासाठी चीन काही करू शकतं- डोनाल्ड ट्रम्प

-एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं; ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो- राज ठाकरे