कोरोना पासून वाचण्यासाठी पंकजाताईंनी दिला हा सल्ला…

मुंबई| सध्या कोरोना देशभरात धुमाकुळ घालतोय, याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी ट्विट करत कोरोनापासून वाचण्यासाठी रामबाण उपाय सांगितला आहे. कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी केवळ मास्क पुरेशे नाही. तापमान वाढत नाही तोपर्यंत जिथे शक्य आहे तिथे लोकांना घरुन काम करायला सांगण्यास काय हरकत आहे, असं त्या म्हणाल्या.

सगळ्या जगात धुमाकूळ घातलेल्या कोराना व्हायरसने भारतात पहिला बळी घेतला आहे. कर्नाटकामधल्या 76 वर्षीय स्थानिक व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कोरोनाचे हे दोन रुग्ण पुण्यामध्ये आढळल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांना आवाहन केलं आहे, ते म्हणाले की, या दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास देखील ठेवू नका.

पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाच झाली असून या सर्वांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

मोदींच्या हातात भारताचं भविष्य सुरक्षित; भाजपात येताच महाराजांना साक्षात्कार

-ज्योतिरादित्य शिंदेंच्या हाती कमळ; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

-आता शरद पवारांचाही बाप काढणार का?; गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

-“…म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री सोडून वर्षा बंगल्यावर जाणार नाहीत”

-“चिंता नसावी, महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे, मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही”