“इस्रोनं जरी मदत केली तरी ‘राहुल’ नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही”

नवी दिल्ली | राहुल गांधी यांची पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्याची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते संबित पात्रा यांनी राहुल यांना टोला लगावला आहे. इस्रोनं जरी मदत केली तरी ‘राहुल’ नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या मर्मावर बोट ठेवलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. संबित पात्रा यांना एका हिंदी वृत्तवाहिनीच्या टॉक शोमध्ये बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल यांच्यावर निशाणा साधला.

काँग्रेस कितीवेळा राहुल नावाचं सॅटेलाईट लाँच करणार आहे. हे सॅटेलाईट आता लाँच होऊ शकत नाही, कारण या सॅटेलाईटचं इंधन संपलं आहे. इस्रोच्या मदतीनंतरही हे सॅटेलाईट लाँच होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. मात्र त्यांची पुन्हा एकदा रिलाँचिग होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-….याप्रकरणी भाजप राधाकृष्ण विखे पाटलांची चौकशी करणार!

-रोहित शर्माच्या मॅचविनिंग खेळीला दिग्गज क्रिकेटपटूंचा सॅल्यूट!

-जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत अरूण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धडक

-पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ काळाच्या पडद्याआड

-आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; चव्हानांनी घेतला आव्हाडांचा समाचार