भाजप नेत्याचं बिंग फुटलं, स्वत:च केला कारनामा; पोलिसांनी CCTV तपासले तेव्हा धक्काच बसला

चेन्नई | तमिळनाडू राज्यातील चेन्नईमध्ये काही दिवसांपूर्वी धक्कादायक घटना समोर आली होती. एका भाजप नेत्याची कार अज्ञान लोकांनी जाळल्याची घटना घडली होती. त्यानंतर चेन्नईमध्ये एकच चर्चा सुरू होती.

भाजपचे जिल्हा सचिव सथीश कुमार यांची कार जाळण्यात आली होती. 14 एप्रिलला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. घटना घडल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी आसपासच्या लोकांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधून काढले आणि संपुर्ण घटनाक्रम चेक केला. त्यावेळी धक्कादायक घटना समोर आल्याचं दिसून आलं.

एक पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती गाडीच्या समोरून जातो. त्यावेळी तो गाडीतून आत डोकावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यानंतर तो तिथून निघून जातो. त्यानंतर गडद रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती त्याठिकाणी येतो.

गडद रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती गाडीवर स्प्रे मारतो. त्यानंतर काही क्षणातच गाडी पेट घेते. त्यानंतर आजूबाजूचे लोक बाहेर येतात, असं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. त्यावेळी लोकं नेत्यांच्या घरी घटना झालेलं कळवतात.

सीसीटीव्ही फुटेज साफ केल्यानंतर पोलिसांनी धक्काच बसला. गाडीला आग लावणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून खुद्द भाजप नेता असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी भाजप नेत्याला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान,  सोनं घेऊन देण्यासाठी भाजप नेत्याच्या बायकोने हट्ट धरला होता. मात्र, नेत्याकडे पैसे नव्हते. नेत्याने इन्श्यूरन्सच्या पैश्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचं समोर आलं आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

शिवसेना आमदाराच्या पत्नीच्या आमहत्येचं गूढ वाढलं, त्या शेवटच्या मेसेजने खळबळ

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका”