‘ऑपरेशन लोटस’ची जबाबदारी या नेत्यांवर?

मुंबई | महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच निर्णायक वळणावर आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने संख्याबळ जमवण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ ची जबाबदारी चार दिग्गज नेत्यांवर सोपवल्याचं कळतंय.

राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते आणि नारायण राणे या चार नेत्यांना ही जबाबदारी दिली गेल्याची शक्यता वर्तविण्यात येतीये. या चारही नेत्यांची काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी आणि नेत्यांशी चांगली ओळख आहे. त्याचबरोबर त्यांना संसदीय राजकारणाचाही दीर्घकाळ अनुभव आहे.

विखे पाटील आणि नारायण राणे काँग्रेसमधून तर गणेश नाईक, बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. आता भाजपचे हे नेते ‘ऑपरेशन लोटस’ची जबाबदारी पेलण्यात कितपत यशस्वी होतात? हे येत्या काही दिवसात आपल्याला समजेलच.

दरम्यान, मी अजुनही राष्ट्रवादीतच असून शरद पवार हेच माझे नेते आहेत, असं ट्विट अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर अजित पवार यांंचं विधान खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. भाजपसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही आणि तसा प्रश्नच उद्भवत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.3

 

महत्त्वाच्या बातम्या-