“शरद पवार राष्ट्रवादीचे मंत्री ठरवतील… त्याच मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री असतील”

मुंबई | मी राष्ट्रवादीतच असून पवारसाहेबच आमचे नेते आहेत… भाजप आणि राष्ट्रवादी राज्याला स्थिर सरकार देईल. पुढची पाच वर्षे लोकांसाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. त्यानंतर काही मिनिटातच आगामी काळात शरद पवारच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपदं वाटतील, असा खळबळजनक दावा भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ यांनी केला आहे. ‘एबीपी माझा’च्या ‘माझा विशेष’ या कार्यक्रमात त्यांनी खळबळनक दावा केलाय.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल. अजित पवार ज्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील त्याच सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते मंत्री असतील आणि शरद पवार त्यांना मंत्रिपदं वाटतील, असं शिरसाठ म्हणाले.

वाहिनीच्या निवेदकाने शिरसाठ तुमच्या विधानाचा नेमका अर्थ काय? असं विचारलं असता, ‘आगे आगे देखो होता हैं क्या?’ असं कोड्यात टाकणारं उत्तर शिरसाठ यांनी दिलं आहे.

दुसरीकडे अजित पवार यांचं विधान खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत आहे. आम्ही एकमताने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-