“भगवा हा आपला राष्ट्रध्वज होईल अन् लाल किल्ल्यावर भगवा फडकेल”

बंगळुरू | देशभरात सध्या हिजाब प्रकरणानं धुमाकूळ घातला आहे. देशभरात या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. अशात मात्र कर्नाटक सरकारचे मंत्री अजब वक्तव्य करत आहेत. परिणामी हा वाद वेगळ्या वळणावर जात आहे.

कर्नाटक सरकारमध्ये ग्रामविकास आणि पंचायतराजमंत्री असलेले केई ईश्वरप्पा यांनी हिजाब वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब परिधान करण्याचा वाद वाढल्यानंतर कर्नाटकमध्ये विविध महाविद्यालयांमध्ये गोंधळ चालला आहे.

हिजाब परिधान करण्याचा विरोध करण्यासाठी म्हणून एका महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज खाली उतरवून त्याजागी भगवा ध्वज फडकवल्यानं राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे.

भगवा ध्वज फडकवल्यानंतर या वादावर कर्नाटक सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर ईश्वरप्पा यांनी या वादावर आपली भूमिका मांडली आहे. ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यानंतर आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

शेकडो वर्षांपूर्वी श्री मारूती आणि प्रभू रामाच्या रथांवर भगवे झेंडे होते. तेव्हा भारतात तिरंगा ध्वज होता का?, असा सवाल ईश्वरप्पा यांनी विचारला आहे. असं असलं तरी आपण तिरंग्याचा मान राखला पाहीजे, असंही ईश्वरप्पा म्हणाले आहेत.

लाल किल्ल्यावर भगवा ध्वज उभारता येईल का?, या प्रश्नावर ईश्वरप्पा यांनी खळबळजनक उत्तर दिलं आहे. आज नाही पण भविष्यात कधीतरी, आज देशात हिंदू विचार आणि हिंदूत्वाची चर्चा होत आहे, असं ईश्वरप्पा म्हणाले आहेत.

अयोध्येत राम मंदिर बांधणार आहोत असं आम्ही म्हणायचो, तेव्हा लोक हसायचे. पण सध्या मंदिर उभारण्यात येत आहे. ना अगदी त्याचप्रमाणं भविष्यात 100, 200, 500 वर्षांनी भगवा हा आपला राष्ट्रध्वज होईल, असं वक्तव्य ईश्वरप्पा यांनी केलं आहे.

भगवा ध्वज फडकवणारे आम्हीच आहोत. या देशात जेव्हा हिंदू धर्म येईल तेव्हा आम्ही लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवू कारण सध्या तिरंगा आपला राष्ट्रध्वज आहे आणि सर्वांनी त्याचा मान राखला पाहीजे, असंही ईश्वरप्पा म्हणाले आहेत.

दरम्यान, हिजाबवरून सुरू झालेला वाद आता भगवा आणि तिरंगा ध्वजापर्यंत पोहोचला आहे. परिणामी कर्नाटकमधील घटनांचे विविध राज्यांमध्ये पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “हा पुरूषार्थ आहे का?”; हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

रानू मंडल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात, यावेळी केलं ‘हे’ मजेशीर काम