उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा; रणजित निंबाळकर म्हणतात…

सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाव्य भाजपप्रवेशाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. भाजप प्रवेशाचं काही माहिती नाही, असं सांगतानाच भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर उदयनराजेंनी कौतुकाचा वर्षाव केला. तर रणजित निंबाळकरांनीही आपण आधीपासून एकत्र असल्याचं सांगत सर्वांना बुचकळ्यात टाकलं

भाजप प्रवेशाचं काही माहिती नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, असं मोघम उत्तर उदयनराजेंनी दिल्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबतचं प्रश्नचि‌न्ह कायम आहे. फलटणमध्ये एका खाजगी दौऱ्यावेळी उदयनराजे आणि रणजित निंबाळकर पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजित निंबाळकर हे माढ्यातून खासदार आहेत.

खासदार रणजित नाईक निंबाळकर हा माझा मित्र खासदार झाल्याचा आनंद आहे, असंही उदयनराजे म्हणाले. आपलं राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही आधीपासूनच बरोबर आहोत, असं सूचक उत्तर रणजित निंबाळकरांनी उत्स्फूर्तपणे दिलं. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षांतराचं गूढ अधिकच वाढलं.

दरम्यान, संघर्षातून उभी राहिलेले लोक कधी कोणापुढे झुकत नसतात. ती लोकांसाठी कायम झटत असतात. त्यापैकी मी आणि रणजित आहोत, असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-पी. चिदंबरम हे ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक; शिवसेनेची ‘सामना’तून टीका

-‘त्या’ ट्वीटवरुन सयाजी शिंदेनी केली दिलगिरी व्यक्त

-महापूराच्या नुकसानीचा अंदाज पाठवा- अमित शहा

-“ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं त्यांच्यावर सूड घेऊन आम्हाला कोणता लाभ?”

-“तुम्ही कितीही चौकशी करा, माझं तोंड मी बंद करणार नाही”