हे सरकार नक्की चालवतंय कोण?? मुस्लिम आरक्षणावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई |  मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आणि त्यापाठोपाठ जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मुस्लिम आरक्षणावरच्या वक्तव्यांनी नवाब मलिक यांची गोची झाली आहे. याच मुद्द्यावरून भाजपने आक्रमक रूप धारण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार नेमकं कोण चालवतंय, असा सवाल केला आहे.

सामनाच्या बातमीचा संदर्भ देत मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार असल्याची बातमी आणि दुसऱ्या दिवशीचा पेपरचा मथळा मुस्लिम आरक्षणाचा प्रस्तावच नाही आदळआपट कशाला?, असा विसंगती दर्शवणारं सामनाचं कात्रण भाजपने ट्वीट करत मंत्री मुख्यमंत्र्यांना विचारून निर्णय घोषित करत नाहीत का? असा सवाल भाजपने केला आहे.

दुसरीकडे माझ्यासमोर आणखी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आलेला नाही. मुस्लिम आरक्षणावरुन आदळआपट करु नका, मुद्दा समोर आल्यावर भूमिका स्पष्ट करु. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सरकारसमोर आल्यावर कागदपत्र तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणीही आपली शक्ती वाया घालवू नये. शिवसेनेनं अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असं उद्धव ठाकरेंनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री म्हणतात ती भूमिकाच योग्य आहे. अजून मुस्लिम आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ आणि समन्वय समितीत चर्चा झालेली नाही. या विषयांबाबत भविष्याकाळात तिन्ही पक्षाच्या चर्चेतून योग्य तो निर्णय आम्ही करू, असं राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एकसारखी आणि मलिक यांच्या विरोधात वक्तव्ये केल्याने त्यांची चांगलीच अचडण झाली आहे. मलिक यांनी परस्पर मुस्लिम आरक्षणासंबंधीची घोषणा केली होती काय? असे सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-“कोण अमृता फडणवीस? त्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

-“अहो, तुम्ही सत्तेसाठी किती हापापलेले आहात हे मध्य प्रदेशच्या ऑपरेशन लोटसवरून दिसून आलं”

-निर्भया प्रकरण: आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

-मोबाईल वापरणाऱ्यांनो जरा सावधान, कारण…

-‘किस घेणं बंद करा’; आरोग्यमंत्र्यांचे देशातील नागरिकांना आदेश