“कोण अमृता फडणवीस? त्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

मुंबई | कोण अमृता फडणवीस? असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांच्या पत्नीचा उल्लेख करत त्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते, असा टोला मनसेच्या नेत्या शालिनी पाटील यांनी लगावला आहे. त्या लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

राजू पाटील यांच्या पत्नी खूप चांगलं काम करत आहेत. मला त्यांच्या कामाची दखल घ्यावी वाटते, असं म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाबद्दल आणि एकंदरित त्यांच्याबद्दलअधिक बोलणं टाळलं.

ट्वीटरवर आज अनेक जण आहेत. ते रोज नवनवे ट्वीट करत असतात. त्यामुळे त्यात नवं काही नाही, असं म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटरबद्दल देखील अधिक बोलणं टाळलं.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधला होता. कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-“अहो, तुम्ही सत्तेसाठी किती हापापलेले आहात हे मध्य प्रदेशच्या ऑपरेशन लोटसवरून दिसून आलं”

-निर्भया प्रकरण: आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

-मोबाईल वापरणाऱ्यांनो जरा सावधान, कारण…

-‘किस घेणं बंद करा’; आरोग्यमंत्र्यांचे देशातील नागरिकांना आदेश

-अहो, हे सरकार उलट्या दिशेने का जात आहे?; विनायक मेटेंचा सरकारला सवाल