358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

मुंबई |  महाराष्ट्रात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. तशी अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. मात्र भाजपने आकड्यांच्या खेळात महाविकास आघाडी सरकारला गाठत शिवभोजन थाळीवरून सवाल केला आहे.

महाविकास आघाडीचं सरकार सांगत आहे की, रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल. मग 358 तहसील, 44 हजार गाव. सांगा एका गावाला किती शिवथाळी??, असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करून सरकारला प्रश्न विचारला आहे.

एक लाख लोकांना शिवभोजन थाळी देणार असं सांगतात ती सुद्धा एकवेळ आणि लॉकडाऊनमुळे रोजगार बंद असताना, अशी टीकाही उपाध्ये यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे. #मंत्री_मस्त_जनता_त्रस्त असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे.

दुसरीकडे कोरोनाचा संकट जाईपर्यंत शिवभोजन थाळी अवघ्या 5 रूपयांत देण्यात येईल, अशी घोषणा राज्य शासनाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रोज 11 ते 3 या वेळेत ही थाळी आता 10 रुपयांऐवजी 5 रुपयांना मिळेल, असं त्यांनी सांगितलं आहे. शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल पुढील तीन महिने ही सवलत देण्यात आली असून यासाठी 160 कोटींचा कार्यक्रम आखला आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-डोनाल्ड ट्रम्प यांची WHO ला धमकी, म्हणाले…

-कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही

-मुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे- ओवैसी

-लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय

-डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर पालटला; आता म्हणतात, ‘नरेंद्र मोदी महान नेते!’