“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

मुंबई | कोरोनाचे युद्ध जनताच लढणार आहे व जनताच त्यात मरणार आहे. सरकारने आता खासदारांचे वेतन, भत्ते यांमध्ये कपात केली हे ठीक आहे, पण परदेशातील काळा पैसा यानिमित्ताने थोडा फार परत आला तरी बरे होईल. मुंबईसारखे शहर केंद्र सरकारला अडीच लाख कोटी रुपये देते. त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला परत मिळावेत. म्हणजे, मोदींच्या खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्री ठाकरे यांनाही कोरोनाचे युद्ध लढता येईल, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

करोना आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीवरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. तसंच महाराष्ट्र भाजपने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत न जमा केल्यावरूनही आजच्या अग्रलेखातून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार निधी उभारण्याचं काम करत आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट उभं आहे. याचसंदर्भात राज्य सरकारनं केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे.

दरम्यान, कोरोनाचे युद्ध जनताच लढणार आहे आणि त्या युद्धात जनताच मरणार आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीवर विश्वास नाही. राज्यपाल हे महाराष्ट्राचे घटनात्मक प्रमुख पण ते ही दिल्लीच्या मार्गाने निघाले. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. महाराष्ट्रात सध्या काँग्रेसचं शासन असते आणि हे असं अतरंगी वर्तन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी वा राज्यपालांनी केले असते तर भाजपच्या मंडळींनी महाराष्ट्रात तांडव केले असते, अशी जोरदार टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

-डोनाल्ड ट्रम्प यांची WHO ला धमकी, म्हणाले…

-कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही

-मुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे- ओवैसी

-लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय