…अन् जे. पी. नड्डांच्या सुरात चंद्रकांत पाटलांनी सूर मिसळला

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपच्या कार्यसमितीने घेतलेल्या कालच्या  बैठकीत भाजपचे कायकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणुकीत जागा भाजपच्या येण्यासाठी तयारी करा, असा सल्ला दिला होता. 

288 जागांवर भापच्याच जागा असतील अशी तयार करा, असं कार्यकर्त्यांना आवाहन करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जे. पी. नड्डा यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

जागावाटप, युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. भाजपच्या विस्तारीत कार्यसमितीच्या बैठकीत ते बोलत होते.

शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याचा विचार करत बसू नका. तर आपल्याला सर्व मतदारसंघात काम करायचे आहे. हे लक्षात ठेवा, असा सूचक सल्ला जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपच्या प्रतिमेला तडा जाईल असं काम माझ्या हातून होणार नाही, बुथ रचनेचं महत्वाचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं म्हणूनच 2014 ला जिंकलो, लोकसभा जिंकलो आणि आता विधानसभाही जिंकू, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

ईव्हीएममध्ये घोटाळा झाला तर मग बारामतीत सुप्रिया सुळे कशा काय जिंकल्या? जर ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असेल तर सुप्रिया सुळेंनी राजीनामा द्यावा, असा टोला पाटलांनी लगावला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसच्या अवस्थेवर रावसाहेब दानवेंचा विनोदी किस्सा… मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना!

“दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय अन् विधानसभेवर भगवा फडकवायचाय”

-दुष्काळ, नापिकीला कंटाळून गावच काढलं विकायला; मायबाप सरकारनं लक्ष देण्याची गरज

-भाजप आज विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार; शिवसेनेला डिवचण्याचे प्रयत्न??

-मतदारांची माहिती आधारला लिंक करा; फडणवीसांची निवडणूक आयोगाकडे मागणी