लखनऊ | आगामी विधानसभा निवडणुकीत 403 जागांपैकी 350 हून अधिक जागा भाजपला (BJP) मिळतील, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
योगी सरकारने 2017 च्या संकल्प पत्रात दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण केलं आहे. 2017 पूर्वी उत्तर प्रदेश हे बिमारू राज्य म्हणून ओळखलं जायचं. आता त्याची ओळख विविध क्षेत्रातल्या विकासासाठी आहे. गेली साडेचार वर्ष आमच्या सरकारने राज्याच्या विकासासाठी काम केलं आहे, असं आदित्यनाथ यांनी सांगितलंय.
आम्ही आमच्या राज्यासाठी आणि राज्यांच्या नागरिकांसाठी केलेल्या कामामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे. त्यामुळे आमच्यापुढे कोणाचं आव्हान आहे असं आम्हाला वाटत नाही. आम्ही शेतकरी, महिला आणि राज्यातल्या गरिबात गरीब व्यक्तीच्या कल्याणासाठी काम केलं, असं योगी म्हणालेत.
2017मध्ये आम्ही शेतकऱ्यांची 36 हजार कोटी रुपयांची कर्जं माफ केली. त्याचा लाभ 2.1 कोटी शेतकऱ्यांना झाला. भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी उत्तर प्रदेश यापुढे महत्त्वाची भूमिका निभावेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
विरोधी पक्षातल्या एकाही नेत्याने आणि समाजवादी पक्षाचा नेता तर आझमगडचा खासदार असूनही कोणीही महामारीच्या काळात कोणत्याही ठिकाणी किंवा कुटुंबांना भेट दिलेली नाही. प्रत्यक्ष युद्धभूमीवर न उतरता घरात आरामत बसून हवेत आरोप करणं सोपं आहे, असं म्हणत योगींनी विरोधकांवर निशाणा साधलाय.
अखिलेश यादव लस न घेऊन आपले डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांचा अपमान करत आहेत. तसंच, निष्पाप व्यक्तींचा जीव धोक्यात घालत आहेत, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं राजकारणापेक्षा महत्त्वाचं आहे. ते नेमकं कोणतं उदाहरण जनतेपुढे ठेवत आहेत? अशा नेत्यांचा सन्मान करायला नको, असंही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब
जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल
10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख
Omicronच्या धोक्यामुळे केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!