मुंबई | काही नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं दिसत आहे. मोबाईल व्हॅनद्वारे देखील प्रयत्न सुरू आहेत. यावर देखील नागरिकांनी सहकार्य केले नाही तर प्रशासन कठोर निर्णय घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
बारामती, इंदापूर तालुक्यात अनेक जण दुसरा डोस घेण्यास उत्सुक असलेले दिसत नाहीत. त्या भागात दुसरा डोस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. ते पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे. या विषाणूपासून संरक्षणासाठी नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावं, असंही ते म्हणाले
‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत गेल्या आठवड्यात लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यात सातत्य राहील असा प्रयत्न करावा. विशेषत: कमी लसीकरण झालेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पुणे जिल्ह्यात शासनाकडून मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून दिले जात असताना ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग कमी असल्याने जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नोव्हेंबर अखेरपर्यंत शंभर टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, बूस्टर डोस संदर्भात आज झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या आहेत. सर्वप्रथम आम्ही दोन्ही डोस कसे देता येतील या दृष्टीने प्रयत्न करत आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
दोन्ही डोस घेतलेल्यांना या विषाणूचा फार काही त्रास होत नसल्याचं आढळून आलं आहे. तर काही प्रकरणात ज्या भागात बूस्टर डोस देण्यात आले आहेत. तेथील नागरिकांना थोड्या प्रमाणात त्रास झाला. परंतु बुस्टर डोस द्यायचा असेल तर त्याचा निर्णय देशपातळीवर घेतला गेला पाहिजे, असं अजित म्हणालेत.
महत्त्वाची बातम्या-
“येत्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत BJP 350 जागांचा आकडा पार करेल”
राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब
जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल
10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख