…नाहीतर भाजपचाच काँग्रेस होईल; चंद्रकांत पाटलांचा काळजीचा सूर

पुणे : राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येणार हे लिहून ठेवा. पण सरकार येणार म्हणून संघटन बांधणीकडे दुर्लक्ष करु नका अन्यथा भाजपचा काँग्रेस होईल, असा काळजीचा सूर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात भाजपचे संख्याबळ 100 च्या खाली येता कामा नये. यासाठी 2 महिने जिद्दीने काम करा, नुसते अहवाल खरडू नका अशी ताकीदही चंद्रकांत पाटलांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.

शहर भाजपतर्फे सोमवारी महर्षीनगर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन झपाटून काम करण्याचं आवाहन केलं.

घराणेशाही, जातीयवाद, भ्रष्टाचार, ही काँग्रेसची संस्कृती आहे. ही काँग्रेसची संस्कृती आपल्याला राज्यातून संपवायची आहे. आणि महापुरूषांच्या विचारांची संस्कृती आपल्याला रुजवायची आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची महिलांना माहिती द्या आणि त्यांच्याकडून राखी घ्या. राज्यभरातून 21 लाख राख्या जमा करुन त्या मुख्यमंत्र्यांना पाठवूण महिलांना भाजपशी जोडण्याचं उद्दिष्ट असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-बीडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला झटका; हे दोन महत्वाचे नेते करणार वंचितमध्ये प्रवेश??

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना आता खावी लागणार जेलची हवा!

-राज ठाकरेंकडून काय धडा घेतला??? आदित्य ठाकरे म्हणतात…

-…अन् खासदार नवनीत राणांनी आपला पहिला पगार मुख्यमंत्र्यांना दिला!

-काँग्रेस म्हणजे जातीयता, घराणेशाही आणि भ्रष्टाचार- चंद्रकांत पाटील