भाजपच्या तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंचं नाव नाहीच

मुंबई | भाजपची तिसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यात केवळ 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र एकनाथ खडसे यांचं नाव या यादीत नाही. 

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. 

भाजपच्या तिसऱ्या यादीत काशीराम पावरा-शिरपूर, मल्लिकार्जून रेड्डी-रामटेक, परिणय फुके-साकोली, रमेश ठाकूर-मालाड पश्चिम या उमेदवारांची नावं भाजपकडून घोषित करण्यात आली आहेत. 

भाजपकडून काही नेत्यांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांच्या मनात आहेत. 

दरम्यान, तिसऱ्या यादीत वगळण्यात आलेल्या नेत्यांची नावं पुढच्या यादीत तरी येतात की नाही? हे पाहणं आता उत्कंठा वाढवणारं आहे. 

महत्वाच्या बातम्या-