“शरद पवार आणि मी तीन दिवसात काय तीन वर्षातही एकमेकांना भेटलेलो नाही”

मुंबई | आपण राष्ट्रवादीच्या कधीच संपर्कात नव्हतो. शरद पवारांशी तीन दिवसातच काय, तीन वर्षातदेखील आपली भेट झाली नसल्याचं भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. 

भाजपची तिसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. त्यात एकनाथ खडसेंचं नाव नसल्याने ते नाराज आहेत. 

एकनाथ खडसेे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि एकनाथ खडसेंची भेट झाल्याचं वृत्त होतं. मात्र खडसेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

शरद पवार आणि मी एकमेकांना भेटलेलो नाही अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही काही निर्णय घेतला आहे का? असं कार्यकर्ते विचारत आहेत.पण असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही आणि घेण्याची शक्यताही नाही, असं म्हणत खडसेंनी पक्ष सोडण्याबाबतच्या बातम्यांचं खंडण केलं आहे.

दरम्यान, शरद पवार आणि एकनाथ खडसेंची भेट झाल्याचं खुद्द खडसेंनी वृत्त फेटाळलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-